Home क्राईम दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला ; शिरसोलीच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला ; शिरसोलीच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
21


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाचा राग मनात धरून दापोरा येथील एका तरुणावर शिरसोली येथे चॉपरने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यात अडवून तरुणासह त्याच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शिरसोली परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ही घटना २६ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र. न. येथील स्मशानभूमीजवळ घडली. या हल्ल्यात जखमी झालेला विशाल विनोद पाटील (वय २१, रा. दापोरा, ता. जि. जळगाव) याला उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विशाल पाटील याने रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून शिरसोली येथील संशयित आरोपी विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल पाटील हा सुप्रीम कंपनीत मजुरीचे काम करतो. २६ जून रोजी रात्री तो त्याचे मित्र रोशन मधुकर लांबोडे आणि ललित ज्ञानेश्वर भोई यांच्यासोबत रोशनच्या पल्सर मोटारसायकलने (क्र. एमएच १९ ईएम ९२९५) शिरसोली येथून दापोरा येथे जात होता.

दरम्यान, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिरसोली स्मशानभूमीजवळ संशयित विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी यांनी त्यांचा रस्ता अडवला. २५ जून रोजी रात्री गावात दर्शन देवरे, रवी मिस्तरी, मयूर भोई आणि प्रेम सोडव यांच्यात झालेल्या भांडणात तुम्ही देखील सहभागी होता, अशी कुरापत काढत संशयितांनी विशाल व त्याच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयितांनी तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी दीपक भिल याने त्याच्याजवळील चॉपरने विशाल पाटील याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि कोपरावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच तिघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर विशाल आणि त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांनी गावातील शुभम सोनवणे याला फोन करून मदतीसाठी बोलावले. शुभम सोनवणे याने जखमी विशालला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound