Home आरोग्य गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह

0
42

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे अंतिम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग आणि जी.एन.एम. विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवार २२ व मंगळवार २३ जून रोजी झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या भरती प्रक्रियेसाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पथकात दीपा देशपांडे (मॅनेजर – एचआर), कुंजन कुलकर्णी (नर्सिंग सुपरवायझर) आणि माधवी चकोले (फ्लोअर मॅनेजर) यांचा समावेश होता. या पथकाने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत संस्थेची कार्यपद्धती, आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक अपेक्षा तसेच करिअर वाढीच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भरती प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची पडताळणी, अभिक्षमता चाचणी, तांत्रिक मूल्यमापन आणि वैयक्तिक मुलाखती अशा टप्प्यांचा समावेश करण्यात आला होता. हा कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला असून, नामांकित आरोग्यसेवा संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर प्रत्यक्ष उद्योगातील आवश्यक कौशल्यांचीही ओळख होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी आणि सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. शेवटी महाविद्यालयाच्या वतीने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या भरती पथकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


Protected Content

Play sound