Home Uncategorized डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेत शैक्षणिक प्रगतीवर सखोल चर्चा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेत शैक्षणिक प्रगतीवर सखोल चर्चा

0
19


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, जळगाव येथे आज 20 जून रोजी पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, शिस्त तसेच व्यावसायिक विकासाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सभेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची सद्यस्थिती, त्यांची नियमित उपस्थिती आणि शैक्षणिक कामगिरी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व महाविद्यालय यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

या प्रसंगी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आपले अभिप्राय, सूचना तसेच काही शंकाही मांडल्या. महाविद्यालय प्रशासनाने सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत पालकांशी सकारात्मक संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबतही प्रशासनाने आश्वासन दिले.

डॉ. हर्षल बोरोले यांनी पालकांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक व महाविद्यालय यांच्यात सतत संवाद आणि समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्तपालन आणि व्यावसायिक नैतिकतेचे पालन करून उत्कृष्ट आयुर्वेद चिकित्सक घडावे, असेही त्यांनी नमूद केले.

या पालक-शिक्षक सभेस महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थी विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा उपक्रमांना अधिक गती देण्याचे संकेत देण्यात आले.


Protected Content

Play sound