Home राजकीय आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर-यावल तालुक्यात वृक्षारोपणाचा संकल्प

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर-यावल तालुक्यात वृक्षारोपणाचा संकल्प

0
59

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर व यावल तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला. “एक वृक्ष लावा, हरित भविष्यासाठी हातभार लावा” या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

महालक्ष्मी बायोजीनिक्स यांच्या सौजन्याने वनोली–रिधुरी–कोसगाव शिवार रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या रोपांची लागवड करून परिसर हिरवाईने समृद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला. वाढत्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेता वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करत उपस्थितांनी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या वृक्षारोपण कार्यक्रमास महालक्ष्मी बायोजीनिक्सचे संचालक डॉ. प्रशांत सरोदे, भूपेंद्र सरोदे तसेच सावदा येथील मान्यवर डॉ. शेखर पाटील, अ‍ॅड. कालिदास ठाकूर, चंद्रसिंग जाधव, राकेश कासार, योगेश राजाराम भंगाळे, प्रगतशील शेतकरी प्रकाश भागवत भंगाळे, धीरज किसन महाजन, जीवन चौधरी (वनोली), प्रकाश बखाल, मुकेश सोनवणे, संदीप अरुण सोनवणे, शालिक सोनवणे, वासुदेव सोनवणे यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दिशा भूपेंद्र सरोदे यांनी मनोगत व्यक्त करत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगितले. विशेष म्हणजे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या पत्नी व लहान मुलांसह या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुटुंबासह सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला. वाढदिवस केवळ शुभेच्छा व औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी उपयुक्त कार्य करून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. भविष्यातही सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी आमदार अमोल जावळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.


Protected Content

Play sound