
अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद ता. चोपडा येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालय व खासगी आदर्श प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

खासगी आदर्श प्राथमिक शाळेत सकाळी ७.१५ वाजता नवीन प्रवेश घेणारे तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव नारायण माळी होते. यावेळी पालक संदीप भोई, फारुख भाई, सचिन राणे, महेंद्र महाजन, रेखाताई महाजन, कविताताई महाजन यांची उपस्थिती होती. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. यावेळी मुख्याध्यापक डी. बी. महाजन, उपशिक्षक आर. जे. महाजन, योगेश साळुंखे, दिनकर वाघ, कामिनी चौधरी, पुनम सुतार, मेघा महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. टी. महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. जे. महाजन यांनी केले.
दुपारी १२ वाजता शामराव येसो महाजन विद्यालयात पाचवीच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित पालकांचेही स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक एन. ए. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, लिपिक सी. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन तसेच पालक देवसिंग पावरा आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी मध्यान्ह भोजनामध्ये विशेष मिष्टान्न म्हणून जिलेबी देण्यात आली. त्यामुळे प्रवेशोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरा केला.



