Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र प्रकाश मराठे यांनी संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन करत पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी या विषयामध्ये सखोल संशोधन कार्य पूर्ण करून डॉ. देवेंद्र मराठे यांनी ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. संशोधन क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि ज्ञानार्जनाच्या ध्यासामुळे त्यांना हे यश मिळाले आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे तांत्रिक शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. मराठे यांनी आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासोबतच नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पनांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाकडे केवळ वैयक्तिक उपलब्धी म्हणून नव्हे, तर संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. अक्षता पाटील यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनीही डॉ. मराठे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या संशोधनामुळे संस्थेची शैक्षणिक प्रतिष्ठा अधिक उंचावल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound