Home Cities धरणगाव धरणगाव बाजार समितीच्या सभेत संचालिकांच्या पतींचा सहभाग !

धरणगाव बाजार समितीच्या सभेत संचालिकांच्या पतींचा सहभाग !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज पार पडलेल्या सभेत चक्क तीन संचालिकेंच्या पतींनी आपल्या पत्नीच्या ऐवजी सभेत सहभागी झाल्याचा प्रकार आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा पार पडली. यात सत्ताधारी आणि विरोधक असे सर्व संचालक सहभागी झाले. यात सत्ताधारी गटातील तीन महिला संचालकांनी सभा सुरू होतांना फक्त सुरवातीची पाच मिनिटे हजेरी लावली. यानंतर सभागृहात त्यांच्या पतींनीच तीन तासांपर्यंत कामकाज पाहिले. विशेष बाब म्हणजे, विशेष म्हणजे सभागृहाबाहेरच प्रोसिडिंग बुक मागवून त्यातच संचालिकांनी सभेला हजर राहिल्याची स्वाक्षरी देखील केली.

या संदर्भात स्थानिक पत्रकारांनी सभागृहाच्या बाहेर बसलेल्या तिन्ही संचालिकांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आम्ही कुणाची तरी वाट पाहत आहोत असे उत्तर दिले. तर त्यांचे पती संपूर्ण चार तासांपर्यंत सभागृहात बसून होते. यामुळे हा प्रकार नेमका काय आहे ? याबाबतची चर्चा परिसरात रंगली आहे.


Protected Content

Play sound