Home क्राईम शेत जमिनीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला ; तीन जणांवर गुन्हा दाखल

शेत जमिनीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला ; तीन जणांवर गुन्हा दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील कळमडू गावातील एकाच कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील आभोणे शिवारातील शेताच्या मालकी हक्कावरून हा वाद झाला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुन्नाबाई अब्दुल पिंजारी (वय ४०, रा. कळमडू, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २० मे रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मुन्नाबाई, त्यांचे दीर अहमद पिंजारी आणि दिराणी रईसाबाई अन्वर पिंजारी हे आभोणे शिवारातील त्यांच्या शेतात असताना संशयित आरोपी गुलाब अमीर पिंजारी, नवाज पिंजारी, वसीम गुलाब पिंजारी यांनी तेथे बेकायदेशीर प्रवेश केला. “तुम्ही जर येथे आले तर तुम्हाला मारून टाकू,” अशी धमकी देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर हा वाद अधिकच विकोपाला गेला आणि आरोपींनी पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला चढवला. गुलाब अमीर पिंजारी याने मुन्नाबाई यांच्या डोक्यात लाकडाने जबर प्रहार केला. पाठोपाठ नवाज पिंजारी याने हातात असलेल्या कुऱ्हाडीने उजव्या हातावर वार केला, तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने अहमद पिंजारी, अस्पाक पिंजारी, सासरे नसरुद्दीन दगा पिंजारी आणि देराणी रईसाबाई यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याचवेळी वसीम गुलाब पिंजारी याने ट्रॅक्टरच्या सायलेन्सरने दीर लुकमान पिंजारी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. स.पो.निरीक्षक प्रविण दातरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.


Protected Content

Play sound