जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून एका २४ वर्षीय तरूणीचा सातत्याने पाठलाग करून, वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अश्लील शिवीगाळ करत मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुनहा दाखल करण्यात आला.
जामनेर तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी तुषार पुंडलिक पाटील (रा. केकतनिंभोरा, ता. जामनेर) हा गेल्या महिनाभरापासून पीडितेचा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन करून छळ करत होता. “माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, नाहीतर तुझे लग्न टिकू देणार नाही, संसार होऊ देणार नाही,” अशी धमकी देत त्याने विवाहितेचा सातत्याने पाठलाग केला.

एवढेच नव्हे तर, आरोपीची विकृती एवढ्यावरच थांबली नाही; त्याने पीडित महिलेचे फोटो तिचे पती हर्षल पाटील व इतर नातेवाईकांना पाठवून, तिच्यावर खोटे आरोप लावून समाजात तिची नाहक बदनामी केली आणि विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयिसत आरोपी तुषार पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



