जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याने प्रवाशांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जळगावमध्ये एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज बुधवार १३ मे रोजी, जळगाव एसटी बस स्थानक येथे उपस्थित सर्व प्रवाशांना उष्माघात रोधक होमिओपॅथी औषधींचे मोफत वाटप करण्यात आले.
हा उपक्रम श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व श्री. पी. ई. तात्या पाटील रुग्णालय, तसेच रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला. यावेळी जळगाव बस स्थानक आगार व्यवस्थापक श्री. संदीप पाटील, स्थानक प्रमुख राजेश पांडे, खेमराज पाटील, बाबू तडवी व इतर कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेड क्रॉसच्या अध्यक्षा मंगलाबाई ठोंबरे आणि श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. प्रदीप चौधरी यांनी उपस्थित प्रवाशांना मार्गदर्शन केले. औषधी कशा प्रकारे घ्यावी आणि कडाक्याच्या उन्हामध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी कशी घ्यावी, याबद्दल प्रवाशांना मोलाचे सल्ले देण्यात आले.
या कार्यात महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी नविरा शेक, विशंभर ढगे, वैष्णवी पाटील, प्रज्वल देशमुख, बिभीषण पोळे, वैष्णवी वडनेरकर, नबील खान आणि युक्ता सुरवाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रवाशांना औषध वाटपात मदत केली. बस स्थानकावरील शेकडो प्रवाशांनी या मोफत सुविधेचा लाभ घेतला असून, या सामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



