Home राज्य अशोक खरातला केवळ आध्यात्मिक श्रद्धेपोटी ‘गुरू’ मानले : रुपाली चाकणकर

अशोक खरातला केवळ आध्यात्मिक श्रद्धेपोटी ‘गुरू’ मानले : रुपाली चाकणकर


नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपासाला वेग आला असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाने (SIT) तब्बल सहा तास चौकशी केली. नाशिक येथे झालेल्या या चौकशीत एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः उपस्थित राहून चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अशोक खरातसोबतचे संबंध, धार्मिक कार्यक्रम, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संपर्क याबाबत त्यांना सखोल प्रश्न विचारण्यात आले.

 


Protected Content

Play sound