Home Cities यावल डांभुर्णीतील डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालयाचा दहावीचा निकाल ७२.७२ टक्के; हिमांगी पाटील...

डांभुर्णीतील डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालयाचा दहावीचा निकाल ७२.७२ टक्के; हिमांगी पाटील प्रथम


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथील डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालयाचा मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल ७२.७२ टक्के लागला असून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यालयातील कु. हिमांगी देविदास पाटील हिने ८६.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच कु. देवयानी प्रशांत पाटील हिने ८०.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. कीर्ती विकास पाटील हिने ७७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर बाजी मारली आहे.

विद्यालयाच्या यशस्वी निकालाबद्दल नवयुवक विद्या प्रसारक मंडळ, डांभुर्णीचे अध्यक्ष दादासाहेब डॉ. विवेक दिवाकर चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र सोनू भंगाळे, सचिव अंकुश चांगदेव फालक तसेच सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक उमाकांत जनार्दन महाजन, पर्यवेक्षक दिनेश सुधाकर ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी घेतलेल्या परिश्रमांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ, पालक आणि विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Protected Content

Play sound