Home राजकीय शरद पवारांनाही द्यावी लागली लाच : निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट

शरद पवारांनाही द्यावी लागली लाच : निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट

0
33

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील ठिबकचे अनुदान मिळवण्यासाठी लाच द्यावी लागली होती असा धक्कादायक गौप्यस्फोट त्यांचेच निकटवर्तीय सुधीर भोंगळे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सुधीर भोंगळे हे राष्ट्रवादी मासिकाचे संपादक असून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शरद पवार यांना ठिबकचे अनुदान मिळवण्यासाठी लाच द्यावी लागली होती असा धक्कादायक दावा केला आहे. ही लाच आपणामार्फतच दिली असल्याची कबुलीदेखील त्यांनी दिली आहे. याबाबत झी २४ तास या वाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.

खरं, म्हणचे लाच मागणे आणि देणे हे दोन्ही कृत्य गुन्हे म्हणून गणले जातात. यामुळे पवार यांनीच जर लाच दिली असेल तर तेदेखील यात सहभागी असल्याचा स्पष्ट होते. आणि जर दस्तुरखुद्द पवार यांनाच लाच द्यावी लागत असेल तर नोकरशाही किती उद्दाम आहे अन् भ्रष्टाचार किती भयंकर प्रमाणात मुरलाय याची भेदक जाणीव होत असल्याचेही अधोरेखीत झाले आहे. या मुद्यावरून सुधीर भोंगळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी याबाबत निश्‍चितच संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. अद्याप तरी शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound