Home Cities अमळनेर भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत एक ठार, दुसरा गंभीर जखमी

भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत एक ठार, दुसरा गंभीर जखमी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर-धुळे रोडवर एक हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर ते धुळे रोडवर लोळवे फाट्याजवळ १ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नंदू किसन वानखेडकर (वय ४५, रा. बाळापूर, ता. जि. धुळे) आणि नाना वानखेडकरहे दोघे जात असताना, समोरून येणारी भरधाव कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे चालवले. रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कार चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात नंदू वानखेडकरयाचा जागीच मृत्यू झाला तर नाना वानखेडकर हे जखमी झाले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी कैलास शिंदे हे करीत आहे.


Protected Content

Play sound