Home क्राईम कचरा उचलण्यावरून दोन भावांना बेदम मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल

कचरा उचलण्यावरून दोन भावांना बेदम मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा परिसरात घराजवळील कचरा आणि काट्याकुट्या उचलण्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

करगाव तांडा येथील रहिवाशी पिनु भावलाल राठोड यांचा भाऊ सोमनाथ याला मोरसिंग हरसिंग राठोड याने २४ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फोन करून घरासमोर असलेल्या काट्यापेट्या आणि उकिरडा उचलून घेण्यास सांगितले होते. याच कारणावरून आरोपीने राग धरला होता. संशयित आरोपी मोरसिंग राठोड, ताई मोरसिंग राठोड, मलखान मोरसिंग राठोड, समाधान मोरसिंग राठोड आणि कृष्णा मोरसिंग राठोड या सर्वांनी संगनमत करून फिर्यादी पिनु राठोड आणि त्यांच्या भावाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झाले. आरोपींनी लाठ्या-काठ्या आणि चापटाबुक्क्यांनी पिनु राठोड व त्याचा भाऊ सोमनाथ राठोड यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे हे करीत आहे.


Protected Content

Play sound