Home क्राईम शेताच्या बांधावरून हाणामारी ; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

शेताच्या बांधावरून हाणामारी ; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल


चोपडा-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामायिक बांधावरील कचरा जाळल्याच्या कारणावरून दोन गटात झालेला वाद टोकाला गेल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, यामध्ये शेतातील केळीच्या पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखली करण्यात आला.

प्रवीण प्रकाश पाटील (वय ५०, रा. पारगाव, ता. चोपडा) हे आपल्या शेतात असताना, शेजारी राहणारे सागर राजेंद्र पाटील आणि राजेंद्र रामदास पाटील यांनी सामाईक बांधावर कचरा पेटवला होता. या कचऱ्याच्या आगीमुळे शेजारी असलेल्या प्रवीण पाटील यांच्या केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

आपल्या पिकाचे नुकसान झाल्याचे पाहून प्रवीण पाटील यांनी सागर आणि राजेंद्र यांना जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, संशयित आरोपींनी प्रवीण पाटील यांच्या पत्नी सरला पाटील यांनाही शिवीगाळ केली. यानंतर प्रवीण पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound