Home Cities मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीड कोटींच्या रस्ता दुभाजक विस्तारीकरणाचे भूमिपूजन

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीड कोटींच्या रस्ता दुभाजक विस्तारीकरणाचे भूमिपूजन


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।   शहराच्या मुख्य रस्त्यांचे रूपडे पालटण्यासाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ व सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून, मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक ते मुक्ताई चौक (बोदवड चौफुली) या मार्गावरील रस्ता दुभाजकाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचा शुभारंभ नुकताच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे महत्त्वाकांक्षी काम हाती घेण्यात आले असून, यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी, २७ एप्रिल रोजी सायंकाळी बोदवड चौफुली येथे या विकासकामाच्या फलकाचे विधिवत भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या रस्त्याचे विस्तारीकरण आणि सुशोभीकरण केल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार असून, यामुळे मुक्ताईनगरच्या सौंदर्यातही मोठी भर पडणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक छोटू भोई, नगरसेवक बबलू कोळी, नगरसेवक बंटी जैन, गणेश टोंगे, प्रमोद भारंबे, मस्तान कुरेशी, आरिफ आझाद, निलेश शिरसाठ, पंकज राणे, अफसर खान, नूर मोहम्मद खान, आसाम शहा, गोपाळ सोनवणे, युनूस खान, वसीम पेंटर, मुशीर मण्यार, संतोष माळी, गौरव दुट्टे आणि आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो


Protected Content

Play sound