Home क्राईम विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर एमआयडीसी पोलिसांची कारवाई

विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर एमआयडीसी पोलिसांची कारवाई


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका डम्परवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिरसोली रोडवरील जैन इरिगेशन जवळ असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक रस्त्यावरून एक डम्पर (क्र.एमएच १९ वाय ६१६१) हा २५ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमाराससंशयास्पद रित्या जात होता. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने या डम्परला थांबवून तपासणी केली असता, त्यात अवैधपणे वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या डम्पर चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डम्पर चालक सुरेश अशोक शोककर (वय २३, रा. धरणगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाईत ६ हजार रुपये किमतीची वाळू आणि ८ लाख रुपये किमतीचा डम्पर, असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार धनराज गुळवे हे करत आहेत.


Protected Content

Play sound