Home क्राईम वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई ; एकावर गुन्हा दाखल

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई ; एकावर गुन्हा दाखल


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. हातेड खुर्द येथे मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडण्यात आला असून, पोलिसांनी ४ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द येथील विकास सहकारी सोसायटीच्या जवळील रोडवरून अवैधपणे वाळूची मोठी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चोपडा ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी २५ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कारवाई करत ट्रॅक्टर चालक विजय किर्ता बारेला (वय ३८, रा. बुधगाव, ता. चोपडा) हा विनापरवाना वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जे हप्त केले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप नन्नवरे हे करत आहेत.


Protected Content

Play sound