Home Cities अमळनेर जमीन लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गंभीर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. मयत आईच्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी आणि शासनाकडून मिळणारा मोबदला लाटण्याच्या उद्देशाने पाच जणांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे समोर आले आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती आशी की, रिना रवींद्र पाटील (वय ४३, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना जून २०१५ पासून सुरू होती. फिर्यादीच्या मयत आई पुष्पाबाई पाटील यांच्या नावावर असलेल्या शेतीवर आपला हक्क असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी खोटे कागदपत्र तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी जमिनीचा ताबा मिळवण्याचा आणि सरकारी मोबदला हडपण्याचा प्रयत्न केला. संशयित आरोपींनी स्वतःला कायदेशीर वारसदार असल्याचे दर्शवून सरकारची आणि फिर्यादीची दिशाभूल केली आहे.

या प्रकरणात ललिता अशोक पाटील (रा. अमळनेर), सुशील सुरेश मुथा (रा. धुळे), अनिता महेंद्र झावर (रा. जळगाव), नामदेव दगा धनगर (रा. अमळनेर) आणि नथू भोमा धनगर (रा. अमळनेर) या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद तोरवणे करत आहेत.


Protected Content

Play sound