Home Cities यावल जे.टी. महाजन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एम.टी.एस. मध्ये यश

जे.टी. महाजन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एम.टी.एस. मध्ये यश


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  फैजपूर येथील जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एमटीएस) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या नावात आणखी भर पडली आहे.

एन. के. नारखेडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित एमटीएस परीक्षेत शाळेतील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. इयत्ता चौथीतील आदित्य अमोल इंगळे याने १३० गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले, तर इयत्ता सातवीतील देवश्री धनराज भंगाळे हिने ३०० पैकी १७० गुण मिळवत सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक पटकावले.

याचबरोबर रुद्रांश विनोद परतणे याने ३०० पैकी १३२ गुण मिळवले, तर तेजल राजेश महाजन हिने ३०० पैकी १७४ गुण मिळवत सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा गौरव वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे संस्थेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे प्राचार्य मोझेस जाधव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व बक्षीस देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षिका सौ. पुनम नेहेते, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता चौधरी यांनी केले.


Protected Content

Play sound