Home Cities जळगाव सामाजिक बांधिलकीतून सरबत व खीर वाटप : इंगळे परिवाराचा उपक्रम

सामाजिक बांधिलकीतून सरबत व खीर वाटप : इंगळे परिवाराचा उपक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, समाजाप्रती असलेले आपले देणं लागते या भावनेतून राहुल इंगळे उर्फ ‘जुनिअर मकरंद अनासपुरे’ परिवारातर्फे गेल्या चार वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा जपला जात आहे. यावर्षीही जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी सरबत आणि खीर वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

मिरवणूक मार्गावर सेवेचा ओघ :
शहरातील मुख्य केंद्र असलेल्या नेहरू चौक परिसरात मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या हजारो भीम अनुयायांसाठी थंडगार सरबत वाटपाची सोय करण्यात आली होती. रणरणत्या उन्हात मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांची तृष्णा भागवण्यासाठी संपूर्ण इंगळे परिवार सकाळपासून ते मिरवणूक संपेपर्यंत सेवा देत होता. यासोबतच एम.डी.एस. कॉलनी परिसरातही मोठ्या प्रमाणावर खीर वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.

सलग चार वर्षांपासून उपक्रम :
इंजि. राहुल इंगळे आणि त्यांचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कार्यांत अग्रेसर असतो. जयंतीच्या निमित्ताने गेल्या चार वर्षांपासून हा अन्नदानाचा आणि सेवाकार्याचा उपक्रम अविरतपणे राबवला जात आहे. केवळ उत्सव न साजरा करता, लोकांसाठी प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे परिवारातर्फे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी इंगळे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. मिरवणुकीतील नागरिक आणि स्थानिक रहिवाशांनी या सेवाभावी उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करत इंगळे परिवाराचे आभार मानले आहेत.


Protected Content

Play sound