यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद येथे भारतरत्न, भारतभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात ग्रामस्थ, पदाधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समता, शिक्षण आणि संविधानाच्या मूल्यांवर आधारित त्यांच्या कार्याची आठवण यावेळी करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची आजच्या काळातही किती आवश्यकता आहे हे अधोरेखित केले.

या प्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत (शशी आबा) गुलाबराव पाटील, सरपंच छोटू भगवान भिल, दिलीप यशवंत पाटील, अरुण दयाराम सोनवणे, विवेक गणपत पाटील, डिगंबर धना सपकाळे, किशोर कडू सपकाळे, अशोक पितांबर महाजन, विकास राजधर पाटील, जगदीश भाऊराव पाटील, शांताराम मार्तंड पाटील, सचिव संजय दिनकर महाजन, पोलिस पाटील हर्षल राजेंद्र पाटील, दत्तात्रय ताराचंद पाटील, साहेबराव महारु पाटील, त्र्यंबक जयराम पाटील, विकास विवेक पाटील, मयूर सुभाष पाटील, रविंद्र राजधर पाटील, भिकन बळवंत पाटील, मुरलीधर सुधाकर पाटील, आकाश रविंद्र सपकाळे, शुभम किशोर सपकाळे, सुर्यभान गोकुळ सपकाळे, सागर शांताराम सपकाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार आणि संविधान निर्मितीतील भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा प्रसार गावपातळीवर अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि आदरयुक्त वातावरणात कार्यक्रम पार पडला.



