Home धर्म-समाज यावलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अभिवादन 

यावलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अभिवादन 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त यावल शहरात मुख्य बुरूज चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भीमसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्य आणि आदरभावाचे दर्शन घडवले.

कार्यक्रमास रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील, धनंजय शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, भाजपाचे डॉ. कुंदन फेगडे, सागर कोळी, नगरसेवक उमेश फेगडे, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे तसेच सविता भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने भीमसैनिक आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती. घोषणाबाजी आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याला अभिवादन केले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते. विविध मान्यवरांनी आपल्या उपस्थितीतून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि तरुण पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound