Home उद्योग सातपुडा अर्बन क्रेडिट सहकारी पतसंस्थेला 62 लाखांचा नफा – नरेंद्र नारखेडे

सातपुडा अर्बन क्रेडिट सहकारी पतसंस्थेला 62 लाखांचा नफा – नरेंद्र नारखेडे


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील सुमारे 40 वर्षांपासून अखंडपणे कार्यरत असलेल्या सातपुडा अर्बन क्रेडिट सहकारी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 62 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. संस्थेचे चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी ही माहिती देताना संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि सभासदांच्या विश्वासाचा विशेष उल्लेख केला.

सातपुडा सहकारी पतसंस्थेने आपल्या स्थापनेपासूनच सभासदांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. यामुळे अनेक शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत झाली आहे. संस्थेच्या या धोरणामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांना आर्थिक आधार मिळत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे.

संस्थेच्या आर्थिक स्थैर्यामुळे सभासदांना दरवर्षी लाभांश (डिव्हिडंड) दिला जातो. याशिवाय, कर्मचाऱ्यांना नियमित पगार, सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्याची परंपरा देखील संस्थेने जपली आहे. या सर्व गोष्टींमुळे संस्थेवरील सभासदांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी सांगितले.

संस्थेच्या यशामागे सभासदांचा प्रचंड आर्थिक विश्वास, काटकसरीची भूमिका आणि संचालक मंडळाची एकविचारी धोरणे ही प्रमुख कारणे असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज सक्षमपणे सुरू असून व्हाइस चेअरमन नितीन चौधरी तसेच संचालक मंडळातील प्रा. एस. जे. पाटील, चंद्रशेखर चौधरी, हेमराज चौधरी, प्रा. पदमाकर पाटील, पांडुरंग सराफ, गिरीश पाटील, सुनील वाढे, नयना चौधरी, सुनीता चौधरी आणि डॉ. उमेश चौधरी यांचे योगदान मोलाचे ठरत आहे. तसेच व्यवस्थापक काशिनाथ वारके आणि किशोर नेहते हे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे पाहत आहेत.


Protected Content

Play sound