Home क्राईम इमारतीवरून उडी मारून शिक्षकाची आत्महत्या

इमारतीवरून उडी मारून शिक्षकाची आत्महत्या

0
52


जळगाव । शहरातील अयोध्यानगरातील सिद्धीविनायक शाळेतील शिक्षक जगन्नाथ विठ्ठल पाटील यांनी आज राहत्या अपार्टमेंटमधील गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली.

जगन्नाथ पाटील यांनी आज शाळेतील घटक चाचणी झाल्यानंतर त्यांनी आजारी असल्याचे सांगून अर्ध्या दिवसाची रजा घेत घर गाठले. यानंतर ते गच्चीवर गेले. तेथून यांनी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जगन्नाथ पाटील यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound