Home क्राईम जुन्या वादातून महिलेचा विनयभंग : दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

जुन्या वादातून महिलेचा विनयभंग : दोन जणांविरोधात गुन्हा दाखल


जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीच्या जुन्या वादातून दोन सख्ख्या भावंडांनी एका २७ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यासह कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी ३१ मार्च रोजी सकाळी हा प्रकार घडला असून, याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित २७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह जामनेर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. त्यांच्या नातेवाईकांशी गेल्या काही काळापासून शेतीच्या कारणावरून जुना वाद सुरू होता. मंगळवारी ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरासमोर उभी असताना, शेजारी राहणारे संशयित आरोपी विकी राजेंद्र ठाकूर आणि सचिन राजेंद्र ठाकूर यांनी वादाला सुरुवात केली.

संशयित आरोपींनी पीडित महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिलेचे पती, सासरे आणि जेठ-जेठाणी यांनाही संशयितांनी बेदम चोप दिला. संतापजनक बाब म्हणजे, झटापटीत आरोपींनी महिलेच्या अंगावरील कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले. या भयंकर प्रसंगानंतर पीडित महिलेने तात्काळ फत्तेपूर पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकी ठाकूर आणि सचिन ठाकूर या दोघांविरोधात विनयभंग, मारहाण आणि चोरीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.


Protected Content

Play sound