Home क्राईम अवैध धंद्यांचे व्हिडिओ काढल्याच्या रागातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला ; ९ जणांविरुद्ध गुन्हा...

अवैध धंद्यांचे व्हिडिओ काढल्याच्या रागातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल येथे एका खळबळजनक घटनेत ५५ वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनीवारी २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल येथे राहणारे माया अनिल तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सुनेने ग्रामपंचायतीच्या कामांची माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली होती आणि गावातील अवैध धंद्यांचे व्हिडिओ बनवले होते, याचाच राग धरून हा हल्ला करण्यात आला.

घटनेच्या दिवशी रात्री आरोपींनी फिर्यादीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. “तुम्ही ग्रामपंचायतीच्या कामाची माहिती का काढता?” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित आरोपी तुषार दिलीप तायडे याने माया तायडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केली. यावेळी फिर्यादीच्या हातापायांना आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या आहेत.

या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये तुषार दिलीप तायडे, रिंकू आनंदा तायडे, करुणेश तुषार तायडे, कविता तुषार तायडे, आरती अरविंद भालेराव, विजया दिलीप तायडे, उषा आनंदा तायडे, विक्की मारुती तायडे आणि अरविंद भालेराव यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी अत्रावल, ता. यावल येथील रहिवासी आहेत. पुढीत पास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे हे करीत आहे.


Protected Content

Play sound