पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा बसस्थानकावरून बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड येथील रहिवाशी असलेल्या शेख महमूद शेख मेहबुब (वय ५१) हे आपल्या मुलगी शिरीनबी जुनैद बागवाण, २४ मार्च रोजी पाचोरा बस स्थानकावर आले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास पाचोरा-जामनेर बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शिरीनबी यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अत्यंत शिताफीने चोरून नेली. यामध्ये ४५ हजारांची सोन्याची पोत, सोन्याच्या बाळ्या आणि ७ हजारांची रोकड असा एकुण ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर शेख मेहमूद शेख मेहबुब यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.




