आमदार भोळेंकडून मेहतर समाजाच्या जळगाव ते राजस्थान रामदेवरा पदयात्रेस शुभेच्छा(व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 07 28 at 12.16.46 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील तरुण सालाबादप्रमाणे यंदाह रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ८:३० वा. श्री रामदेवजी बाबा मदिर राधाकृष्ण मंगल कार्यालया समोर, सिंधी कॉलनी रोड येथील पूजा अर्चना-आरती करुन पदयात्रेकरु राजस्थान मधील रामदेव बाबा मंदिरासाठी पदयात्रेसाठी मार्गस्थ झाले.

 

या पदयात्रेत सहभागींना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुरेश भोळे, नगरसेवक भगत बालाणी, सुभाष हंसकर, अशोक हंसकर, यांच्यासह ह् मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.  पदयात्रेकरु जळगाव, भगराया, तोपता सेंधवा (म.प्र.), जुलवानिया, गुजरी घाट, रतलाम, सैलाना, प्रतापगड (राज.) आगरी माताजी, सावलीयाजी, नाशप्यारा, राजसमन्द, केलवा, चारभुजा, देसुरी, नाडोल,पाली,जोधपुर, पोमु, डेषु पोखरण रुणीचा, रामदेवरा ग्राम (जसमलेर जिल्हा) येथे जातील.

पदयात्रेत यांचा समावेश
पदयात्रेत दरवषप्रमाणे जळगाव येथील रविंद्र अशोक हराकर, जितु भैय्या टाक, अनिलभाऊ ठाकरे, नितीनभाऊ चौधरी, ईश्वर भैय्या टाक, हर्षल तेजकर, विजय महाराज व जयंतभाऊ शिंदे त्यांचा मित्र परिवार यारा रवाना होतील. य. सुकलालजी करोसिया यांच्या प्रेरणारा व रविंद्र हंसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ जवळ ९ वर्षापासून अविरत यात्री यात्रा करीत आहे, सदर यात्रा पुर्णकरण्यासाठी ३० दिवसांचा  कालावधी लागतो. या पदयात्रेकरुंचा उत्साह वाढविण्यासाठी समाजातील सर्व भाविक भक्तांनी सकाळी ८.३० वा. श्री रामदेवजी बाबा मंदिर राधाकृष्ण मंगल कार्यालय समोर, सिंधी कॉलनी रोड येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content