उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात वह्या वाटप व वृक्षारोपण

579ff6e9 d309 4fb1 81b9 87e0493f173b

धरणगाव (प्रतिनिधी)स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हा विचार घेऊन आज शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध विद्यालयांमध्ये वृक्ष रोपण व गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

 

आज दि.२७ जुलै २०१९ रोजी शहरातील इंदिरा कन्या हायस्कुल, पि. आर. हायस्कुल, अँग्लो उर्दु हायस्कुल, जि. प. उर्दू शाळा नं.२ या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने धरणगावात शालेय वह्यांचे वाटप व वृक्ष रोपण करण्यात आले.

 

या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, उपनगराध्यक्षा अंजली विसावे, चर्मकार समाजाचे कार्यध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, भागवत चौधरी, अहमदखान पठाण, जितेंद्र धनगर, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, मोतीलाल पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, बुट्या पाटील ,युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, युवासेना उपतालुका प्रमुख कमलेश बोरसे, युवासेना उपशहर प्रमुख पप्पू कंखरे, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख वसीम पिंजारी, बालू जाधव, तौसिफ पटेल, जयेश महाजन, राहुल रोकडे, सद्द्दाम अली, अरविंद चौधरी, गोलू चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.

 

Protected Content