
भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील संगतसाहेब गुरूद्वारसमोर दुचाकी लावल्याच्या कारणावरून एका कापड व्यापाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील संगतसाहेब गुरूद्वारा समोर सोनुसिंग दिपसिंग बावरा वय ४२ हे वास्तव्याला आहे. मंगळवारी ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सोनुसिंग बावरा यांनी त्यांची दुचाकी गुरूद्वाराजवळ पार्क करून लावली. या रागातून संशयित आरापी भुषण मिस्तरी उर्फ बॉबी, प्रसाद किनगे उर्फ खब्या आणि त्याच्यासोबत असलेले १० ते १५ जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी सोनुसिंग बावरा यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या जमावावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजस पारिस्कर हे करीत आहे.



