Home प्रशासन नगरपालिका बोदवडमध्ये विकासकामांचा धडाका : पाणीपुरवठा योजना आणि अत्याधुनिक व्यायामशाळेचे भूमिपूजन !

बोदवडमध्ये विकासकामांचा धडाका : पाणीपुरवठा योजना आणि अत्याधुनिक व्यायामशाळेचे भूमिपूजन !


बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. आ.चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शहरातील प्रभाग क्र. १० मधील आधुनिक व्यायामशाळेचे भूमिपूजन आणि ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

आरोग्यदायी बोदवड: प्रभाग क्र. १० मध्ये व्यायामशाळा
शहरातील तरुण पिढीला सुदृढ आरोग्य, सकारात्मक ऊर्जा आणि उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने प्रभाग क्र. १० मध्ये आधुनिक व्यायामशाळेचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या व्यायामशाळेमुळे स्थानिक युवक-युवतींना व्यायामासाठी दर्जेदार साधने आणि पोषक वातावरण उपलब्ध होणार असून, खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

मुबलक पाणीपुरवठा: सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना
बोदवड शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत भव्य पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. या नवीन योजनेमुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार असून, महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. या विकासकामामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती:
या शुभप्रसंगी आमदार चंद्रकांतभा पाटील यांचे सुपुत्र चि. हर्षराज पाटील, माफदा महाराष्ट्र अध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, महाराष्ट्र अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष अफसर खान, बोदवड नगराध्यक्ष मीराबाई माळी आणि उपनगराध्यक्ष रेखा गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिवसेना-युवासेना, भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बोदवडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound