Home क्राईम जळगावातील तरूणीचा विनयभंग : एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगावातील तरूणीचा विनयभंग : एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

0
168


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणारी तरूणी ही आपल्या आजीच्या घरी गच्चीवर पापड वाळत घालण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शनीवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील एका भागात तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनीवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेहरूण येथील श्रीराम मंदिर चौकात राहणाऱ्या आपल्या आजीच्या घरी गेली होती. गच्चीवर पापड वाळत घालत असताना, त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भावेश भानुदास पाटील (रा. मेहरूण) हा तिथे आला. त्याने पीडित तरुणीचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली. याप्रकरणी तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी भावेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound