Home क्राईम अडावद शिवारातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

अडावद शिवारातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद गावातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही अडावद शिवारात असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहे.


Protected Content

Play sound