Home क्राईम शेतकऱ्याचे बंद घर फोडून दोन लाखांचे दागिने लांबविले !

शेतकऱ्याचे बंद घर फोडून दोन लाखांचे दागिने लांबविले !


बोदवड- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावात एका शेतकऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ९० हजार ७५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील रहिवासी समाधान पोपट पाटील (वय ६२) हे आपल्या कुटुंबासह राहतात. २२ ते २३ फेब्रुवारी दरम्यान त्याचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या, कानातील झुमके, सोन्याचे तुकडे असा एकुण १ लाख ९० हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound