Home क्रीडा पाकवरील विजयानंतर सूर्यकुमार यादवची इंस्टाग्रामवरील ‘ती’ पोस्ट प्रचंड चर्चेत

पाकवरील विजयानंतर सूर्यकुमार यादवची इंस्टाग्रामवरील ‘ती’ पोस्ट प्रचंड चर्चेत


कोलंबो-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर आपला दबदबा सिद्ध करत 61 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलंबो येथील टी२० विश्वचषक २०२६  स्पर्धेत रंगलेल्या या सामन्यानंतर मैदानात आणि सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र विजयाइतकाच चर्चेचा विषय ठरला तो कर्णधार सूर्यकुमार यादव याची तीन शब्दांची इंस्टाग्राम पोस्ट.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत दमदार कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारत भारताने 175 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. सुरुवातीला दोन झटपट विकेट गेल्यानंतर Ishan Kishan याने 77 धावांची जबाबदारीपूर्ण खेळी साकारत डाव सावरला. त्यानंतर तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला 175 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातच डळमळीत झाली. भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि आक्रमक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना सावरू दिले नाही. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीच्या षटकांतच तीन महत्त्वाच्या विकेट घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे पाकिस्तानचा डाव कधीच रुळावर आला नाही आणि अखेर संपूर्ण संघ 114 धावांवर गारद झाला.

सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर संघासोबतचे काही फोटो शेअर केले. त्या फोटोला त्याने केवळ ‘हर हर महादेव’ असा तीन शब्दांचा कॅप्शन दिला. या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक चाहत्यांनी संघाच्या आक्रमक रणनीतीचे कौतुक केले, तर काहींनी या विजयाला “ऐतिहासिक” असे संबोधत उत्साह व्यक्त केला. काहींनी या पोस्टमुळे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया देखील दिली.

सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाले की, या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला. त्यांच्या मते, 155 धावाही स्पर्धात्मक ठरल्या असत्या; मात्र 175 धावा केल्यामुळे संघाला स्पष्ट आघाडी मिळाली. ईशान किशनच्या खेळीचे विशेष कौतुक करत त्यांनी सांगितले की, सुरुवातीचे विकेट्स पडल्यानंतर जबाबदारी स्वीकारणारा फलंदाज आवश्यक होता आणि ईशानने ती भूमिका उत्कृष्टरीत्या निभावली.


Protected Content

Play sound