कोलंबो-वृत्तसेवा | येथे आज झालेल्या टि-20 विश्वचषकातील साखळी सामन्यात आज टिम इंडियाने पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडवत जोरदार विजय संपादन केला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टी20 विश्वचषक सामना खेळला गेला. भारताने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी20 विश्वचषक सामन्यात प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 175 धावा केल्या. ईशान किशनने सर्वाधिक 77 धावा केल्या. भारतासाठी ईशान किशनने सर्वाधिक 77 धावा केल्या.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. संघाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार सलमान अली आगाने त्याला बाद केले. पॉवरप्लेमध्ये भारताने एक गडी गमावून 52 धावा केल्या. ईशान किशनने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. ईशान किशनने 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याने 10 चौकार आणि तीन षटकार लगावले. उस्मान तारिकला 11व्या षटकात गोलंदाजीची संधी मिळाली, त्याने आपल्या पहिल्याच षटकात 6 धावा दिल्या. तिलक वर्मा 24 चेंडूत 25 धावाच करू शकला. हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. शिवम दुबे 17 चेंडूत 27 धावांवर धावबाद झाला. अक्षर पटेल पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. पाकिस्तानसाठी साइम अयूबने तीन, तर उस्मान, शाहीन आणि सलमान यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघालाही पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पांड्याने त्याला बाद केले. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात साइम अयूबला एलबीडब्ल्यू बाद केले. अयूबने दोन चेंडूत 6 धावा केल्या. बुमराहने याच षटकात कर्णधार सलमान अली आघालाही बाद केले. सलमान 4 चेंडूत 4 धावाच करू शकला. बाबर आझम 7 चेंडूत 5 धावाच करू शकला. अक्षर पटेलने त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले.
पण यानंतर उस्मान खान आणि शादाब खान यांनी डाव सावरला. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली. 10 षटकांनंतर पाकिस्तानचा स्कोअर 71-4 असा होता. मात्र उस्मान आणि शादाब यांच्यातील 39 धावांची भागीदारी अक्षर पटेलने मोडली. अक्षरने 11व्या षटकात उस्मानचा बळी घेतला. उस्मानच्या बॅटमधून 34 चेंडूत 44 धावा निघाल्या. यानंतर कुणीही पाकी फलंदाज तग धरू शकला नाही. आणि भारताने शानदार विजय संपादन केला. त्यानंतर १२ व्या षटकात कुलदीपने मोहम्मद नवाजची विकेट घेतली. नवाजने फक्त ४ धावा काढल्या. १३ व्या षटकात तिलक वर्मा टाकायला आला आणि पहिल्याच चेंडूवर शादाबला बाद केले. शादाबने १४ धावा काढल्या. त्यानंतर १६ व्या षटकात वरुणने पाकिस्तानला आठवा धक्का दिला. फहीम १० धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर वरुणने अबरारलाही बाद केले. त्यानंतर हार्दिकने शेवटची विकेट घेतली. पाकचा डाव 114 धावांमध्ये आटोपला आणि भारताने 61 धावांनी विजय मिळवला.



