Home राजकीय मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात !

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात !


बारामती-वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती येथे अपघात झाला असून यात काही जण गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ मोठा अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. या अपघातात पवार यांच्यासह काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार हे लहान विमानाने बारामतीकडे रवाना झाले होत्ो. येथे लँडींग करत असतांनाच विमानतळाच्या जवळ असलेल्या शेतात हे विमान कोसळले.

या अपघातात स्वत: अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानीक आणि त्यांचे सहकारी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्त्ुाळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार हे सभा घेणार होत्ो. याचसाठी त्ो बारामती येथे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर प्रशासनाच्या वतीने अद्यापही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

(सविस्तर माहिती लवकरच )


Protected Content

Play sound