Home धर्म-समाज सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा; अनिष्ट लग्नरुढींवर बंदीचा एकमताने निर्णय

सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा; अनिष्ट लग्नरुढींवर बंदीचा एकमताने निर्णय


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने आयोजित वधू-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. राज्य व परराज्यातून आलेल्या वधू-वरांनी सहभाग नोंदवत परिचय करून दिला, तर मान्यवरांच्या हस्ते ‘रेशीमबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सामाजिक सलोखा, सुजाण वैवाहिक निवड आणि समाजातील सकारात्मक बदल यांचा संदेश देणारा हा मेळावा ठरला.

रावेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरत महापालिका सभापती तथा सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मराठे होते. खासदार प्रतिनिधी बुऱ्हाणपूरचे गजेंद्र पाटील, प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, जिल्हा बँक संचालिका जनाबाई महाजन, भानुदास पाटील (जळगाव), माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेविका शारदा मराठे, नगरसेवक अशोक पवार, बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, उबाठा जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष गंगाराम दाणी, प्रा. उमाकांत महाजन, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, सचिव मोहन महाजन, सहउपाध्यक्ष मुकेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान समाजभूषण पुरस्कार देऊन रामकृष्ण पाटील यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष प्रा. उमाकांत महाजन यांनी प्रस्तावना सादर करत मेळाव्याच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. गजेंद्र पाटील, रमेश पाटील आणि गुलाबराव महाराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करत समाजातील ऐक्य, शिक्षण आणि सुसंस्कृत परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘रेशीमबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, ज्यातून वैवाहिक जुळणी प्रक्रियेला सुबक आणि सुलभ दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे समाजातील काही अनिष्ट लग्नरुढींवर बंदी घालण्याचा एकमताने घेतलेला निर्णय. पाय धुणे, नारळ लावणे आणि लग्न समारंभ वेळेत न लावणे अशा प्रथांना आळा घालण्याचे ठरविण्यात आले. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले असून, साधेपणा आणि समतोल मूल्यांवर आधारित विवाहसंस्कृती रुजविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राज्यभरातून आलेल्या वधू-वरांनी व्यासपीठावर स्वतःचा परिचय देत शिक्षण, व्यवसाय, कुटुंबीय पार्श्वभूमी यांची माहिती मांडली. उपस्थित पालक व नातेवाईकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजेश महाजन, संजय महाजन, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे, गायकवाड, सुभाष महाजन, महेश शिंदे, शाम शिंदे, जितेंद्र महाजन, सुनील शिंदे, नरेंद्र शिंदे, बापू महाजन, सुनील महाजन, पवन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound