सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेच्या प्रशासनिक कामकाजाला अधिक गती देण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विषय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आज, १९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेत सावदा नगरपालिकेच्या पाचही विषय समित्यांची रचना पूर्ण करून त्यांच्या सभापतींची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र./न.पा./संकलन ९/सा.निवडणूक/२९१/२०२६ दिनांक १४ जानेवारी २०२६ अन्वये ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. विषय समिती सदस्यांचे नामनिर्देशन आणि सभापती पदाच्या निवडणुकीसाठी ही सभा घेण्यात आली. या सभेसाठी बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आणि सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

या सभेत नगरविकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी आणि नियोजनबद्ध कामकाज व्हावे, या उद्देशाने पाणीपुरवठा व जलनिस्सारण, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य, शिक्षण-क्रीडा-सांस्कृतिक कार्य, नियोजन व विकास तसेच महिला व बालकल्याण अशा पाच विषय समित्यांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक समितीमध्ये सभापती आणि सदस्यांची नेमणूक करत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी श्री. फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांची निवड करण्यात आली असून, सदस्य म्हणून श्री. पंकज राजाराम येवले, श्री. फिरोजखान अब्दार खां, सौ. सिमा वेडू लोखंडे आणि सौ. रेखा राजेश वानखेडे यांचा समावेश आहे. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सौ. प्रतिक्षा मनिष भंगाळे यांची निवड झाली असून, या समितीत सौ. रंजना जितेंद्र भारंबे, श्री. पंकज राजाराम येवले, श्री. विशाल प्रेमचंद तायडे आणि श्री. सुनिल नेमीदास जंगले सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी सचिन चुडामण बराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत गणेश भागवत सोनवणे, फिरोजखान अब्दार खां, सौ. विजया कुशल जावळे आणि सौ. सिमरन राजेश वानखेडे यांचा समावेश आहे. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी नकुल नितीन बेंडाळे यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून सौ. रंजना जितेंद्र भारंबे, रूखसार शेख सलीम अहमद पिंजारी, राजेश गजानन वानखेडे आणि हेमंत रूपा महाजन यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. जयश्री अतुल नेहेते यांची निवड करण्यात आली असून, या समितीत सौ. सुनिता संजय तायडे, तबस्सुमबानो फिरोजखान पठाण, सौ. सिमा वेडू लोखंडे आणि सौ. विजया कुशल जावळे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय, स्थायी समितीच्या सभापतीपदी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण, सौ. प्रतिक्षा मनिष भंगाळे, सचिन चुडामण बऱ्हाटे, नकुल नितीन बेंडाळे आणि सौ. जयश्री अतुल नेहेते हे सदस्य असतील.
नवनियुक्त सभापती व सदस्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, विकासकामे तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विषय समित्यांच्या स्थापनेमुळे सावदा शहराच्या विकास प्रक्रियेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



