अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील झामी चौक येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पिडीत मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पिडीत मुलीचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज हे करीत आहे.




