Home क्राईम गोळीबाराने हादरले भुसावळ : टपरी चालक गंभीर जखमी; हल्लेखोर फरार !

गोळीबाराने हादरले भुसावळ : टपरी चालक गंभीर जखमी; हल्लेखोर फरार !

0
273


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पान टपरी चालकावर चौघांनी गोळीबार केल्याची घटना रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.

या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जुना सातारा परिसरातील खळवाडीकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या उल्हास गणेश पाटील (वय 39) यांच्या मालकीच्या पानटपरीवर थरार घडला. उल्हास पाटील हे टपरीत बसलेले असतांना तोंड झाकून आलेल्या चार जणांनी त्यांच्या पान टपरीतील रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. टपरी चालकाने याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या चोरट्यांनी थेट उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ते चौघे भामटे मोटारसायकलवरून पळून गेले.

अवघ्या काही क्षणांमध्ये घडलेल्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यात उल्हास गणेश पाटील यांच्या छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या हल्ल्याची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound