Home Cities एरंडोल नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडता विकासाला मत द्यावे- डॉ.नरेंद्र ठाकूर

नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडता विकासाला मत द्यावे- डॉ.नरेंद्र ठाकूर

0
109

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल शहरातील भाजप शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या कॉर्नर सभेला महिला आणि पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. ठाकूर यांनी मतदारांना मोठे आश्वासन देत, निवडणूक झाल्यानंतर तात्काळ शहरात १२० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याची ग्वाही दिली.

या सभेला माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर, अशोक चौधरी, राजू आबा चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील, सुनील भैया पाटील, योगेश महाजन, माजी नगरसेवक संजय भाऊ महाजन, गजानन महाजन, रामभाऊ चौधरी, सुनील चौधरी आदी मान्यवर तसेच युतीचे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाजप-सेना युतीचे पॅनल शहरातून पूर्णपणे निवडून द्या, शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कार्यसम्राट आमदार अमोल दादा पाटील यांची पूर्ण साथ असल्याने गावाचा विकास १००% होणार, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. जास्तीत जास्त मतांनी युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे जाहीर आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. “मी बाहेरचा उमेदवार नसून, माझा जन्म, लहानपण आणि शिक्षण हे सर्व याच गावात झाले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “गेल्या पंधरा वर्षांपासून माझी पत्नी सौ. गीतांजली ठाकूर या एरंडोल शहरात सोनोग्राफी सेंटर चालवून शहराची सेवाच करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावे. आम्ही देखील शहरासाठी भरघोस निधी आणू आणि शहराचा विकास जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात नावाजला जाईल असा करू.”


Protected Content

Play sound