Home आरोग्य जळगावात व्हॅस्कुलर सर्जन डॉ. अमित राणे यांच्या सेवांचा शुभारंभ

जळगावात व्हॅस्कुलर सर्जन डॉ. अमित राणे यांच्या सेवांचा शुभारंभ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे आता शहरात प्रसिध्द व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. अमित राणे यांची तज्ज्ञ सेवा उपलब्ध झाली आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारी या दिवशी रिंग रोडवरील महेश प्रगती मंडळासमोर तुषार पॅथॉलॉजी येथे ते रुग्णांची तपासणी आणि उपचार देणार आहेत. रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी ही सुविधा मोठी संधी ठरणार आहे.

जळगावातील तुषार पॅथॉलॉजीमध्ये सुरू झालेल्या या सेवेअंतर्गत व्हेरिकोस व्हेन्स, न भरणाऱ्या जखमा, जुन्या जखमा, चालताना पाय दुखणे, गँगरीन, डायबेटिक फूट, स्ट्रोकसंबंधी रक्तवाहिन्यांचे विकार, एओरटिक अन्यूरिसम, एओरटिक डिसेक्शन, डायलिसिससाठी आवश्यक ऍक्सेस (ए.बी. फिस्टुला, परमकैथ), तसेच रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या गुठळ्या (डीप व्हेन थ्रोम्बोसिस, पल्मनरी एम्बोलिसम) यांसारख्या गंभीर आजारांचे निदान व अत्याधुनिक उपचार उपलब्ध राहणार आहेत. या तज्ज्ञ उपचारांमुळे जळगाव आणि परिसरातील रुग्णांना पुणे, मुंबईसारख्या महानगरांकडे जाण्याचा त्रास व खर्च दोन्हीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

या आरोग्यसेवेचा प्रारंभ होताना गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. तुषार बोरोले, डॉ. निलीमा बोरोले, सदस्या डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील आणि डॉ. नुपूर राणे यांनी डॉ. अमित राणे यांचे स्वागत करून त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.

डॉ. अमित राणे हे समर्पित आणि कुशल व्हॅस्क्युलर तसेच एंडोव्हॅस्क्युलर सर्जन म्हणून ओळखले जातात. त्यांनी मिरज येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे सर्जिकल हाऊसमन म्हणून काम केले. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून जनरल सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण काळात त्यांनी राष्ट्रीय परिषदांमध्ये पेपर्स सादर करत सक्रिय सहभाग नोंदवला. पुढे प्रा. डॉ. डी. आर. कामेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुबी हॉल क्लिनिकमध्ये सुपर स्पेशालिटी (डीएनबी व्हॅस्क्युलर सर्जरी) पूर्ण केली. या प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांमधून व्हॅस्क्युलर सर्जरीतील एकमेव निवासी म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली.


Protected Content

Play sound