जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील पाथरी रोडवर झालेल्या एका दुर्दैवी अपघातात वाघ नगरातील ५४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद मृत महिलेचा मुलगा मिलिंद भिका चौधरी (वय ३४, रा. वाघनगर, जळगाव) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे वडील भिका देवराम चौधरी (रा. वाघनगर) हे त्यांची आई सरला भिका चौधरी (वय ५४) यांना (क्र. MH-१९-EQ-३९१२) क्रमांकाच्या दुचाकीवर पाठीमागे बसवून जळगाव ते चाळीसगाव प्रवास करत होते.

गुरूवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाथरी गावाजवळील रोडवर दुचाकी भरधाव वेगात असतांना दुचाकी ही रस्त्याच्या डिवायडर धडक दिली. त्यामुळे गाडीचा तोल जाऊन सरला चौधरी रस्त्यावर खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्यास व चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहेत.



