
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मायादेवी मंदीरसमोरील एनसीसी कार्यालयाजवळ पैशांवरून झालेल्या वादातून एका प्रौढाला शिवीगाळ करत चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, देविदास गोवर्धन चितळे वय ५४ रा. वाघ नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चाट सेंटर दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता जळगाव शहरातील महाबळ येथील एनसीसी कार्यालयाजवळ असतांना संशयित आरोपी गणेश बुधा सोनवणे रा. समता नगर, जळगाव याने पैशांवरून वाद सुरू केला. या वादातून संशयित आरोपी गणेश सोनवणे याने देविदास चितळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर चॉपरने वार करून त्यांच्या हाताला दुखापत केली. याप्रकरणी देविदास चितळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील हे करीत आहे.



