चिमुकल्याचा दुर्दैवी अंत! गरम पाणी अंगावर पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू !

0
111


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाटीका आश्रम परिसरात राहणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर भाजला गेल्याने उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन जितेंद्र पाटील वय ४ रा. वाटीका आश्रम, जळगाव असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील वाटिका आश्रम परिसरात चेतन पाटील हा चिमुकला आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. आठ दिवसांपुर्वी घरात चिमुकला हा घरात खेळत असतांना बाथरूमध्ये गेल्यानंतर बादलीत असलेले गरम पाणी अंगावर पडले. त्यामुळे भाजला गेला होता. त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.