जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँड या अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनीच्या लाईट कमर्शियल व्हेइकल्स (LCV) साठी ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अधिकृत सेल्स आणि सर्व्हिस पॉईंटचे भव्य उद्घाटन गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जळगावात होणार आहे. या शानदार सोहळ्याला अशोक लेलँड लिमिटेडचे LCV प्रमुख श्री. विप्लव शाह यांच्यासह महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याने जळगावकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
कुठे होणार उद्घाटन?
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अजिंठा रोडवर, मारुती सुझुकी शोरूमसमोर, जी-५/१ येथे हे अत्याधुनिक शोरूम उभारण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल, यासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या नव्या शोरूममुळे अशोक लेलँडचे नवीन ‘साथी’ हे लाइट कमर्शियल वाहन जळगावच्या ग्राहकांसाठी प्रथमच उपलब्ध झाले आहे. तसेच, ‘दोस्त’ आणि ‘बडा दोस्त’ यांसारखी लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाहने खरेदी करणे जळगाव जिल्ह्यातील व्यावसायिक, वाहतूकदार आणि शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे.
विक्री आणि सर्व्हिसिंग एकाच ठिकाणी
अयांश ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून ग्राहकांना केवळ विक्रीची सेवाच नव्हे, तर विक्रीपश्चात उत्कृष्ट सेवाही मिळणार आहे. एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीच्या मागे, ई-८ येथे वाहनांचे सर्व्हिसिंग तसेच वाहनांचे ओरिजिनल सुटे भाग (Spares) उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या सर्व सुविधांमुळे जळगाव आणि परिसरातील ग्राहकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास ‘अयांश ऑटोमोबाईल्स’चे संचालक यश सुनील मंत्री यांनी व्यक्त केला आहे. या भव्य शोरूमच्या माध्यमातून अशोक लेलँड जळगावमध्ये आपला व्यवसाय अधिक विस्तारण्यास सज्ज झाले आहे.



