Home क्राईम किरकोळ कारणावरून कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण

किरकोळ कारणावरून कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण

0
178


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावात एका कुटुंबाला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्याती कानळदा गावात सुनिता रूपजा सोळंखे वय ३५ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मुलांवरून झालेल्या वादातून सुनिता सोळंखे यांच्या संपुर्ण कुटुंबाला गावात राहणारे दिलीप बारेला, सुनिल बारेला, अनिल बारेला आणि सयाबाई बारेला सर्व राहणार कानळदा ता. जळगाव या चौघांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात सोमवारी १३ ऑक्टेबर रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास इंगळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound